Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
जत तालुक्यातील निगडी खुर्दचे जवान अजित काशिद शहीद
News Image

26-Sep-2017 : जत / प्रतिनिधी

जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील जवान अजित नारायण काशिद (वय 24) हा भारत-चीन सिमेवर डोकलाम येथे सेवा बजावत असताना वाहनाच्या अपघातात गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, उपचार सुरू असताना त्यांच्या मृत्यूची घटना कुटुंबियाना समजली. सेवा बजावत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला असल्याने त्यांना मंगळवारी शहीद घोषित करण्यात आले. तर आज बुधवारी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

जिल्हा सैनिक विभागाकडून याची माहिती मिळताच जत तालुका प्रशासनाकडून याची तयारी करण्यात आली आहे. काशिद यांना शहीद घोषित केल्याचा संदेश पाठविण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी शासकीय इतमामात त्यांच्या मुळ गावी निगडी खुर्द येथे अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तशी तयारी निगडी येथे करण्यात आली आहे.

मिळालेली अधिक माहिती अशी, अजित काशिद हे युनिट 121 इंजिनिअर रेजिमेंन्टमध्ये कार्यरत होते. डोकलाम सेक्टर कुपुक येथे त्यांचा दि.17 सप्टेंबर रोजी वाहनाचा अपघात झाला. उपचार सुरू असताना दि.25 रोजी सुमारे 3.45 वाजता ते शहीद झाले. हा अपघात सेवा बजावत असताना झाल्याने त्यांना मंगळवारी शहीद घोषित करण्यात आले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter