Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
वाहनाच्या धडकेत सोनीतील वृद्ध ठार

14-Oct-2017 : मिरज / प्रतिनिधी

सोनी ते भोसे रस्त्यावर सकाळी 6.30 वा. सुमारास रस्त्यावरून बाबासो पाटील (वय 60 रा.सोनी) हे चालत जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माजी जि. प. सदस्य राजेंद्र महादेव माळी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात वर्दी दिली आहे. अज्ञात वाहनांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करीत आहेत.

बाबासो पाटील हे सकाळी 6.30 वा. सुमारास रस्त्यावरून निघाले होते. सकाळी भरधाव वेगाने अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की ते जागीच कोसळले व त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहन भरधाव वेगाने निघून गेले.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter