Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी

08-May-2020 : सांगली / प्रतिनिधी

विधानपरिषदेच्या निवड णुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते.

यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत बहुजन वंचित आघाडीकडून लढणार्‍या पडळकरांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील नेते त्यांची नाराजी दूर करणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

राज्यात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक लागली असल्याने राजकीय पक्षांमध्ये वातावरण ढवळून निघाले आहे. या निवडणुकीमुळे सांगली जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या जिल्ह्यात भाजपचे एक खासदार आणि दोन आमदार आहेत. याशिवाय जिल्हा परिषद, सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, सात पंचायत समित्या, बाजार समितीमध्ये भाजपची सत्ता आली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यातील एकामागून एका स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थावर ताबा घेत भाजपने दबदबा निर्माण केला , मात्र विधानसभा निवडणुकीत दोन जागा गमावल्याने भाजपची ताकद कमी झाली. निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनदेखील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंगे्रस आणि कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे सत्तेबाहेर बसावे लागले. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाची छबी आणखी सुधारण्यासाठी भाजपाने तयारी सुरु केली आहे.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter