08-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बामणोली येथील दादासो अण्णा फोंडे यांच्यासह कुटुंबियांना संस्था क्वॉॅरंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. घर बंद असल्याचा फायदा घेऊन काही चोरट्यानी बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ३३ हजार रूपयांसह ६३ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
या चोरीबाबत बामणोलीचे पोलीस पाटील शिवाजी कल्लाप्पा चिनमुरे (वय ३७, रा. बामणोली) यांनी कुपवाड एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की , दुधेभावी येथील मुंबईहून आलेल्या ‘त्या’ ४० वर्षीय तरुणाच्या संपर्कात आलेल्या आणि त्याची नातेवाईक असणार्या कुपवाड येथील वाघमोडेनगर येथील १७ वर्षीय तरुणीचा कोरोना अहवाल २ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या बामणोलीतील त्यांच्या नातेवाईकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये दादासो फोंडे यांना कुटूंबासह ३० एप्रिल रोजी संस्था क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
|