08-May-2020 : आटपाडी / प्रतिनिधी
टेम्पोच्या पुढील भागातील काचेवर औषधे आणि अत्यावश्यक सेवेचा कागद चिकटवून कर्नाटकातून कर्हाडला जात असलेला तब्बल ८ लाखांचा गुटखा आटपाडी पोलिसांनी जप्त केला. उंबरगाव (ता.आटपाडी) येथे तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली.चालक ध्रुपचंद प्रेमचंद पांडे (वय ४०, रा.मऊ, मध्यप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे.
ही कारवाई पोलिस निरिक्षक बजरंग कांबळे यांच्यासह उपनिरिक्षक अजित पाटील, प्रकाश कांबळे, सहाय्यक निरिक्षक सुधीर पाटील, हवालदार नंदकुमार पवार यांनी केली.
|