08-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
जिल्ह्यात अडकून पडलेल्या परजिल्ह्यातील नागरिकांच्या जिल्हा प्रशासनाकडे येत असलेल्या ऑनलाईन अर्जांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत प्रशासनाकडे जिल्ह्याबाहेर जाण्या साठी ११ हजार ७०१ अर्ज आले आहेत. त्यापैकी अनेक जणांनी दुबार अर्ज केले आहेत. दररोज दोन हजार अर्जांवर निर्णय घेतला जातो. सबळ कारणाअभावी ३ हजार ६३८ जणांना परजिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी नाकारली आहे. बाहेरील जिल्हा व राज्यातून १ हजार ६४७ लोकांना सांगली जिल्ह्यात येण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, परप्रांतियांना बाहेरील राज्यात जाण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्रांची अट राज्य सरकारने रद्द केली आहे. अनावश्यक कारणां साठी प्रवास टाळावा असे आवाहनही त्यांनी केले. गरज असेल तरच लोकांनी प्रवासासाठी परवानगी मागावी. दुबार अर्ज करु नये. सध्या आलेले अर्ज तपासणीचे काम १२ अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ११ हजार ७०१ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील अनेकांचे दुबार अर्ज आले आहेत. यातील सबळ कारणा अभावी ३ हजार ६३८ जणांचे अर्ज फेटाळले आहेत. असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले.
|