09-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात यंत्रणा सतर्क करून जिल्ह्याबाहेरून येणार्यांची तपासणी केल्याशिवाय त्यांना गावामध्ये प्रवेश मिळता कामा नये, अशा सक्त सूचना जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण सभापती आशा पाटील यांनी दिल्या.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभा घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भूपाल गिरीगोसावी उपस्थित होते. व्हिडीओ कॉन्फरन्स सभेत माजी आरोग्य सभापती तमनगौडा रवी-पाटील, वैशाली कदम, रेश्मा साळुंखे, मंगला नामद, संगीता पाटील, सरिता कोरबू, निजाम मुलाणी आदिंनी सहभाग घेतला होता.
सभापती पाटील म्हणाल्या, आंतरराजीय चेक पोस्ट वर चोख तपासणी व्हावी. जिल्ह्याच्या चेकपोस्टवरही यंत्रणा सतर्क असायला हवी. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण असताना, ग्रामीण आरोग्य यंत्रणेत मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांच्यापासून ते गावातील आशा महिलेपर्यंत सर्वांनी अतिशय चांगले काम केले आहे, म्हणूनच आपल्या जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आहे.
|