09-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
सांगलीतील अभयनगर येथे चारचाकी गाडी वेगाने चालवण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन टोळीमध्ये तुंबळ हाणामारी झाली. टोळी युद्धात तलवारी सारखे हत्यार, बांबू, दांडके आणि दगड या हत्यारांचा वापर करण्यात आला. दोन्ही टोळीतील चौघे जण जखमी झाले आहेत. रामा रवींद्र देवल (वय ३१ रा. अभयनगर) आणि अमरनाथ उर्फ पवन परशुराम माळी (वय २२ रा. झेंडा चौक अभयनगर) यांनी परस्पर विरोधी फिर्याद दिली असून दोन्ही टोळीतील सहा जणांवर संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अमरनाथ उर्फ पवन परशुराम माळी, अवधूत पाटील हे दोघे आणि दोघे अनोळखी इसम. तर दुसरी टोळी रामा रवींद्र देवल आणि लहू घागरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामा देवल त्याचा मित्र लहू घागरे आणि प्रदीप काळेल हे तिघे इनोव्हा गाडीतून बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास अभयनगर इथे नक्षत्र व्हील अपार्टमेंट समोर गाडीतून खाली उतरले.
|