09-May-2020 : सांगली प प्रतिनिधी
जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास येथे खेळत असता, लहान मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सुनील रामचंद्र माने (वय ३२) याचा मुलगा आदित्य याला झोपलेल्या ठिकाणी डोक्यात दगड मारून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खंडू नागेश जोगदाडे (वय ५१) याच्यावर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस आणि घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, वाल्मिकी आवासमध्ये बुधवारी सकाळी अपार्टमेंट समोर मोकळे जागेत लहान मुले गोट्याने खेळत होते. यामध्ये सुनील माने याचा मुलगा आदित्य आणि खंडू जोगदाडे याचा मुलगाही खेळत होता.
|