09-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
शहरातील रेव्हेन्यू कॉलनीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तातडीने २० नागरिकांना संस्था तर ६० जणांना होम क्वारंटाईन केले आहे. कंटेन्मेंट झोन मधील १२०० नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली आहे. यामध्ये आयएलआय किंवा सारीचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती वैद्यकीय आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांनी दिली.
|