09-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
कोरोनाच्या संकटात अनेक लोकप्रतिनिधी परप्रांतिय कामगारांना हुसकावून त्यांना मूळ गावी पाठवत आहेत. या कामगारांना थांबविण्यसाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. अन्यथा सांगली जिल्ह्यातील उद्योग कोसळतील, अशी भीती महापालिका क्षेत्रातील उद्योजक संघटनांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे २ हजार कोटींची उलढाल ठप्प झाली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबरचे ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे सचिन पाटील, सांगली, मिरज कुपवाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, उदयसिंह पाटील, अनंत चिमड, भालचंद्र पाटील, रमेश आरवाडे, प्रकाश शहा, बाजीराव ओतारी, शैलेंद्र केळकर, आर. के. इरळे, शिवानंद कबाडे आदि महापालिका क्षेत्रातील उद्योजकांनी वसंतदादा औद्योगिक वसाहत सोसायटीच्या कार्यालयात बैठक घेतली.
या बैठकीनंतर बोलताना रवींद्र माणगावे म्हणाले, महापालिका औद्योगिक क्षेत्रात अकरा हजार उद्योगधंदे आहेत. त्यामध्ये सुमारे बारा हजार परप्रांतीय कामगार आहेत. सध्या त्यांना परत गावी जाण्यासाठी काही लोकप्रतिनिधी व प्रशासनामार्फत प्रोत्साहन दिले जात आहे.
|