09-May-2020 : मिरज / प्रतिनिधी
सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील विजयसिंहराव दादासाहेब नानगुरे (वय २८) यांना दिलीप बिल्डकॉमच्या कामगार कन्हैया जवाहरलाल सिंग (वय २९) आणि रुपेंद्र रवींद्रसिंह तोमर (वय २८) यांसह सात ते आठजणांनी सिगारेट देत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानाची तोडफोड करून चारचाकी गाडीही पेटवली व मोटरसायकलीचे ही नुकसान केले. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या राड्यात अंदाजे एकूण १ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून दुकानदार विजयसिंहराव नानगुरे यांनी मिरज ग्रामीण पोलिसात कन्हैया कुमार व इतर सातजणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. मिरज ग्रामीण पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी कन्हैया जवाहरलाल सिंग (वय २९) आणि रुपेंद्र रवींद्रसिंह तोमर (वय २८) यांना अटक केली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, दिलीप बिल्डकॉम कंपनीच्या माध्यमातून महामार्गाचे काम सुरू आहे. त्या कामासाठी परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात आहेत. सिद्धेवाडी खणीजवळ मोकळ्या जागेवर पाटगाव हद्दीत राहण्याची सोय केली आहे. त्याच ठिकाणी विजयसिंराव नानगुरे यांची जमीनही आहे. तेथेच त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले आहे.
|