11-May-2020 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी
कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगांवनजिक म्हैशाळ योजनेच्या कालव्याच्या पाण्यात हात पाय धुण्यासाठी गेलेल्या ट्रक चालकाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली.
पोलीसाकडून समजलेली माहिती अशी की, ट्रक चालक रामराव साहेबराव निकम(वय ४०, रा. चिलूआंबा, ता.अंबेजोगाई, जि.बीड) असे मृत चालकाचे नांव आहे. सदरचा चालक हा अंबेजोगाईहून माल वाहतूक ट्रक घेवून वाळवा तालुक्यातील नेर्ले गावाकडे जात होता. ट्रक रस्त्याच्या कडेला उभी करून रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास चालक बोरगांव हद्दीतील तासगांव रस्त्यालगत असलेल्या म्हैशाळ योजनेच्या कालव्याच्या पाण्यात हात पाय धुण्यासाठी गेला असता पाय घसरून पाण्यात पडला व त्याचा बुडून मृत्यू झाला.
हे त्याच्या समवेत असलेल्या ट्रक चालक महादेव काशीदास वाघमारे यांनी पाहीले. त्यामुळे ट्रक चालकाची ओळख पटू शकली.
|