11-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील कामेरी येथील ९४ वर्षीय कोरोनाबधित आजीच्या चौदा दिवसांच्या औषधोपचारानंतर कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्या कोरोना मुक्त झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. आजीला यापुढे संस्था क्वॉरंटाईनमध्ये ठेवले जाणार आहे.
सांगलीतील महसूल कॉलनी मधील त्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील वीसजणांची आज मंगळवारी कोरोना तपासणी केली जाणार आहे.
|