11-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
कोरोना महामारीमध्ये आपल्या घरी जाण्यासाठी लोकांचे प्रयत्न सुरू होते, मात्र लॉकडाऊन सुरू असल्याने ते शक्य होत नव्हते, अखेर तिसर्या लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता दिल्यामुळे लोक आता आपापल्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात तब्बल ७ हजार ६३६ लोकांनी प्रवेश केला आहे. यापैकी इतर जिल्ह्यातून ४ हजार ७४९ लोक आले असल्याची नोंद जिल्हाभरातील चेकपोस्टवर झालेली आहे. जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात सर्वाधिक १४२८ लोक आले आहेत. येणार्या लोकांची तपासणी करून त्यांना होम क्वॉरंटाईनचा शिक्का मारून प्रवेश दिला जात आहे.
परजिल्ह्यातून, परराज्यातून जिल्ह्यात येणार्या व्यक्तींची जिल्ह्याच्या सीमेवरच तपासणी केली जात आहे, तपासणी केल्यानंतर ती व्यक्ती गावात प्रवेश करण्यापूर्वीच ग्रामपंचायतींना, ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंधात्मक समितीला माहिती दिली जात आहे. लॉकडाऊनमुळे परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेल्या कामगार, विद्यार्थी, पर्यटक यांना स्वगृही येण्यासाठी सर्वत्र ऑनलाईन पध्दतीने परवानगी देण्याची प्रक्रीया सुरू आहे,
|