11-May-2020 : विटा / प्रतिनिधी
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने साळशिंगे (ता. खानापूर) येथील कोरोनाबाधित त्या महिलेच्या संपर्कातील सात जणांना इन्स्टिट्यूटशनल क्वॉरंटाईन केले आहे. संपूर्ण गावात कंटेन्मेंट झोन लागू केला असून आरोग्य विभागाने गावात घर टू घर सर्व्हे केला आहे. गावातील सर्व रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले असून संपूर्ण गावात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिली.
अहमदाबादहून गेल्या आठ वड्यात साळशिंगे येथे आलेल्या महिलेचा रविवारी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
|