11-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
बिसुर मधील ओढ्याच्या पात्रातून वाळू चोरी करणार्या टोळी विरोधात बिसुर गावच्या तलाठी वैशाली प्रवीण वाले यांनी फिर्याद दिली असून वाळू चोरी करणारे चेतन सदाशिव पाटील (रा.बुधगाव) आणि पिकअप गाडीचे चालक यांच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि, बिसुर गावात मोठा ओढा आहे, त्या ओढ्यातून वारंवार वाळू चोरी केली जाते. तलाठी वैशाली वाले यांनी राजकिय दबावाला न जुमानता वाळू चोरी करणार्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दिली. अशीच चोरी होत असता, बिसुरचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील आणि गावकर्यांमुळे चोरट्याचा डाव हाणून पाडण्यात यश आले. २८ हजार ७३७ रुपये किंमतीची दोन ब्रास वाळू सोडून चोरटे पळून गेले.
|