11-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
दोघांची भांडणे सोडविण्यासाठी मध्ये बोलला म्हणून याचा राग मनात धरून दारूची बाटली मारून दोघांना जखमी केले. अशी फिर्याद अजित परशुराम जाधव (वय २८ रा.महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी , जुना कुपवाड रोड , कुपवाड) यांनी दिली असून राजू चव्हाण याच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता विजयनगर रोडवर अजित जाधव आणि त्याचा मित्र आकाश निघाले होते. निहाल रंगारी यांच्या चिकन दुकानासमोर राजु चव्हाण आणि निहाल रंगारी याच्यात मावा कुठे मिळतोय या कारणावरून वाद सुरू होता. भांडण सुरू असताना अजित जाधव याने त्या दोघांना कशाला भांडता, घरी जा असे म्हटले . याचा राजु चव्हाण राग याला आला. त्याने त्याच्या हातातील दारूची बाटली फेकून अजित जाधव याचा मित्र आकाश याच्या तोंडावर मारली. तोंडावर काचेची बाटली लागल्याने आकाश याचा चेहरा रक्तबंबाळ झाला.
|