11-May-2020 : आटपाडी / प्रतिनिधी
चिंचाळे (ता.आटपाडी) येथील दोन जणांनी खरसुंडी येथील विहिरीतील पाण्याच्या मोटारी चोरल्या होत्या. आटपाडी पोलिस ठाण्यात तशी तक्रार नोंद करण्यात आली होती.चोरून आणलेल्या मोटारी विक्रीसाठी घेवून जाताना आटपाडी पोलिसांनी ही कारवाई केली असून यामध्ये दोन मोटारी व चोरट्यांनी वापरलेली बुलेट असा एकूण १ लाख २० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खरसुंडी गावाच्या हद्दीत कॅनालजवळ प्रमोद सिध्देश्वर सैंब आणि सतिश कालीदास पुजारी यांच्या मालकीच्या शेतजमीनीमध्ये असलेल्या विहिरीतील पाण्यातील मोटार दि.५ मे रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात दि.१० मे रोजी गुन्हा नोंद झाला होता.
|