15-May-2020 : जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील मुंचडी येथे शिवकुमार बाबु तेली या २६ वर्षीय तरुण शेतकर्याचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
शिवकुमार गुरूवारी रात्री शेतास पाणी पाजण्यासाठी गेला होता. दरम्यानच्या काळात शेत तलावात किती पाणी आहे पाहण्यासाठी तोे गेला असता त्याचा पाय घसरून तो शेत तलावात पडल्याने व त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मुत्यू झाल्याचे समोर येत आहे. शिवकुमार तेली याचे शेत कोटलगी रस्त्याला असून शिवकुमार याच्या वडिलांचे २०१२ साली निधन झाले होते. त्याच्या दोन बहिणींचे लग्न झाले असून व एक लहान भाऊ बंगळुरू येथे पोलीस विभागात नोकरीला आहे. शिवकुमार व त्याची आई शेती बघतात. गुरुवारी रात्री ९.३० च्या दरम्यान शिवकुमार हा शेताला जाऊन येतो म्हणून आईला सांगून घरातून निघून गेला. घटनेची माहिती मिळताच सरपंच युवराज पाटील, महावितरण अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
|