15-May-2020 : सांगली प प्रतिनिधी
व्याजाने घेतलेले पैसे मुद्दल आणि व्याजासह परत फेड करूनही पैशांसाठी वारंवार शिवीगाळ करून मारहाण होऊ लागल्याने खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून सुनील रावसाहेब कट्याप्पा (वय ४२ रा. समडोळी) यांनी पोलीसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी खासगी सावकार प्रकाश उर्फ बाहुबली पारिसा देमाण्णा उर्फ बेले (रा.समडोळी) या सावकारा विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
|