15-May-2020 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी
दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. दुष्काळी भागातील शेतीच्या पाण्यासाठी आ. सुमनताई पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे दुष्काळी भागातील शेतीला पाणी मिळणार आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. दुष्काळी भागातील शेतीला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदामंत्री जयंतराव पाटील नियोजन करीत असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांनी केले.
कवठेमहांकाळ येथील तहसील कार्यालयातील आढावा बैठकीनंतर सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी आ.सुमनताई पाटील, महांकाली सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे, तहसीलदार बी.जी.गोरे, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली.तासगांव, कवठेमहांकाळ मतदारसंघात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले जात आहे.
|