15-May-2020 : मांजर्डे / वार्ताहर
आरवडे (ता. तासगाव) येथे रात्री अकराच्या सुमारास सविता राजेंद्र चव्हाण यांच्या हार्डवेअरच्या दुकानास आग लागून संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत दुकानाचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले .
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सविता राजेंद्र चव्हाण यांच्या दुकानास रात्री अकराच्या सुमारास लागलेली ही आग दुकानाच्या मागील बाजूस राहणार्या लोकांच्या निदर्शनास आली. आग इतकी भीषण होती की आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले.
यामध्ये मोटर, केबल, स्टार्टर, पीव्हीसी फिटिंग मटेरियल, फर्निचर, ठिबक पाईप असे एकूण पाच लाख रुपयांचे सामान जळून खाक झाले. ं दोन महिन्यांपूर्वी दुकानाचे मालक राजेंद्र चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले . त्यानंतर हे दुकान त्याच्या पत्नी पाहत होत्या पण रात्री हे दुकान जळून खाक झाल्याने त्याचा आधार तुटला आहे. त्यामुळे त्याच्या कुटूंबियांना याची नुकसान भरपाई मिळवी अशी मागणी होत आहे.
|