15-May-2020 : इस्लामपूर /प्रतिनिधी
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी कृषि राज्यमंत्री आ. सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये शासनाच्या जमावबंदी व संचारबंदी आदेशाचे उल्लंघन न करता ‘अंगण हेच आंदोलन’ हे डिजिटल आंदोलन पार पडले. डिजिटल आंदोलनाची सरकारने दखल घ्यावी, अन्यथा भविष्यात सरकारची झोप उडविणारे अनोखे आंदोलन केले जाईल असा इशारा आ.सदाभाऊ खोत यांनी दिला.
सध्या कोरोना विषाणुच्या पार्श्वभुमीवर कोणताही अर्थतज्ञ शेतकर्यांच्या शेतातील नुकसानीचा आकडा सांगू शकत नाही. अशा परिस्थितीत करोडो लोकांच्या , मजुरांच्या हाताला काम देणारा व हजारो व्यावसायिकांना, हजारो कंपन्यांना व्यवसाय देणारा, हजारो कोटी कर देणारा शेती हा उद्योग अडचणीत आहे. शेतकर्यांचा सातबारा कोरा करणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत शेतकर्यांना उभारी देण्याची गरज असताना शेतकरी कर्जमाफीचे घोंगडे भिजत ठेवलेले आहे. कृषी पंप वीज बिलातून शेतकर्यांना पूर्ण मुक्त करणे गरजेचे आहे. आज कोरोनाचे संकट पुढे असले तरी अन्नधान्याचा पुरवठा व निर्मिती करण्याची फार मोठी जबाबदारी शेतकर्यांवर येऊन ठेपली आहे.
|