Dainik Janpravas, Sangli Click Here To Visit e-News Paper
कौलगे येथील वृध्देची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

15-May-2020 : तासगाव / प्रतिनिधी

तालुक्यातील कौलगे येथील लक्ष्मी शिवाजी फडतरे (वय ६०) या वृद्धेने आजारपणाला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी पहाटे ५ च्या दरम्यान घडला. या प्रकरणी सावर्डे येथील पोलीस पाटील सुरेश खराडे-पाटील यांनी तासगाव पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी या सावर्डे - कौलगे रोडजवळ इरळे मळ्यानजीक राहतात. त्या हृदविकार व अर्धांगवायू या आजारांनी ग्रस्त होत्या. त्या सातत्याने चिडचिड व तणावात असायच्या. डॉक्टरच्या सल्ल्याने त्या दररोज पहाटे व्यायाम करायच्या. शुक्रवारी पहाटे त्या नेहमीप्रमाणे सावर्डे रोडला व्यायामासाठी घरातून निघून गेल्या व जवळच असणार्‍या दिलीप इरळे यांच्या विहिरीत चप्पल काढून उडी मारली.

दरम्यान लक्ष्मी अजून का आल्या नाहीत याची शोधाशोध सुरू झाली.

Copyright © 2015 To Janpravas, Sangli | All Rights Reserved. | Designed & Developed By Mahesh Patil | Visitor Count : free visitor counter