15-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
साळशिंगे (ता. खानापूर) येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्दमधील एका अकरा वर्षांच्या मुलाचा तर वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे मुंबईतून आलेल्या ३० वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. जिल्ह्याला साळसिंगे कनेक्शन पडले महागात पडले असून कडेगाव तालुक्यात कोरोनाची एन्ट्री झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. तेथील चौदाजणांना संस्था क्वारंटाईन करण्यात आले आहे. अहमदाबादमधून आलेल्या अन्य तिघांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १५ वर पोहोचली.
|