23-May-2020 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी
कवठेमहांकाळ तालुक्यातील शिवाजीनगर, थबडेवाडी येथील संतोष तानाजी खोत (वय १६) या शाळकरी तरूणाने झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, कवठेमहांकाळ ते जत रस्त्या लगत असलेल्या ज्ञानदेव शंकर खोत यांच्या मालकीच्या शेतातील विहिरी जवळील वडाच्या झाडाला ठिबकच्या पाईपने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात आपघाती मृत्यूची नोंद झाली आहे. अधिक तपास हवालदार दादासाहेब ठोंबरे करीत आहेत.
|