23-May-2020 : कवठेमहांकाळ / प्रतिनिधी
जुन्या भांडणाचा राग मनात धरुन कवठेमहांकाळ येथील बेघर वसाहतीमध्ये चाकू व लाकडाच्या ओंडक्याने केलेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला आहे. शनिवार दि २३ मे रोजी दुपारी ३.१५ च्या सुमारास सदरची घटना घडली आहे.
या मारहाणीत सिद्धार्थ अनिल वाघमारे (वय २३, रा.आंबेडकरनगर, कवठेमहांकाळ) हे गंभीर जखमी झाले आहेत.तर पोलिसांनी गणेश चंदनशिवे व उल्ल्हास चंदनशिवे (रा.आंबेडकर नगर कवठेमहांकाळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ अनिल वाघमारे (वय २३) व्यवसाय - चालक यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या आत्त्यांची मोटरसायकल (क्रमांक- एम.एच.१०/ बी.क्यू ३८१५) या वरुन येत असता गणेश चंदनशिवे यांनी मोटरसायकल अडवून लाथाबुक्यानी व डाव्या हातावर चाकूने मारहाण केली. ‘तु आज सापडला आहेस, तुला जिवंत ठेवणार नाही’ असे म्हणून ठार मारण्याच्या उदेशाने फिर्यादीच्या कानावर व डोकीत आरोपी उल्ल्हास चंदनशिवे याने लाकडी ओंडक्याने दोन तीन वेळा प्रहार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.
जखमी सिध्दार्थ वाघमारे यांच्यावर कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दोन आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलिस निरीक्षक दिपाली गायकवाड करीत आहेत.
|