23-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
तुंग जवळील विठलाईनगर येथील चांदोली वसाहतीमधील पाहिलीत शिकणार्या सात वर्षांच्या चिमुरडीचा गळा आवळून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. या चिमुरडीच्या खून प्रकरणी विठलाईनगर परिसरात राहणार्या एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले असून त्याने या खुनाची कबुली दिली आहे. अतिशय नाजूक पद्धतीने हे प्रकरण हाताळत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने याचा तपास करत मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ पाहून त्याच्या आहारी गेलेल्या या अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार करून त्या चिमुरडीचा खून केल्याचा धक्कादायक उलगडा पोलीस तपासात झाला आहे.
बुधवार दि. २० मे रोजी विठलाईनगर येथील चांदोली वसाहत मध्ये राहणारी ७ वर्षीय मुलगी खाऊ आणण्यासाठी जातो म्हणून गेली होती, ती घरी परत आलीच नाही. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला असता ती कोठेच आढळली नाही. दुसर्या दिवशी गुरुवारी दि. २१ मे रोजी चांदोली वसाहतमधील वासू पाटील यांच्या उसाच्या शेतामध्ये या चिमुरडीचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळला. या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा लेगिन्सने गळा आवळत डोक्यात दगडाने मारून खून केला होता. एका सात वर्षीय मुलीचा खून झाल्याच्या घटनेने जिल्हा हादरून गेला होता.
|