23-May-2020 : सांगली / प्रतिनिधी
सांगलवाडी मध्ये तांबोळी आणि भाटकर या दोन कुटुंबात किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. अशपाक राजू तांबोळी (वय २५ रा. हरुगडे प्लॉट सांगलवाडी) यांनी ऋतुजा राजेंद्र भाटकर आणि शुभम राजेंद्र भाटकर याच्या विरोधात तर ऋतुजा राजेंद्र भाटकर (वय ४५ रा.हरुगडे प्लॉट सांगलवाडी) यांनी राजा तांबोळी, जावेद तांबोळी आणि अरबाज तांबोळी याच्या विरोधात तक्रार दिली असून पाच जणांविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तांबोळी आणि भाटकर हे दोन्ही कुटंब हरुगडे प्लॉट सांगलवाडी येथे एक मेका शेजारी राहण्यास आहेत. दोन्ही घरांच्या मध्ये छोटासा बोळ आहे. त्या बोळच्या जागे मध्ये भाटकर यांनी काही सामान ठवले होते. हे सामान काढा असे तांबोळी कुटूंबियांनी सांगितले होते. मात्र भाटकर यांनी बोळातील समान काढले नाही. या भांडणाची सुरवात इथून झाली. प्रथम शाब्दिक वादावादी झाली नंतर दोन्ही कुटूंबा मध्ये लाथाबुक्क्यांनी तुंबळ हाणामारी झाली. अशपाक तांबोळी, यांनी ऋतुजा भाटकर आणि शुभम भाटकर याच्या विरोधात लाथा बुक्यानी मारहाण करीत, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल फिर्याद दिली आहे. तर ऋतुजा भाटकर यांनी राजा तांबोळी, जावेद तांबोळी आणि अरबाज तांबोळी या तिघांनी लाथा बुक्यानी मारहाण करीत, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे अशी फिर्याद सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. दोन्ही कुटुंबातील पाच जनांच्या वर्ती भारतीय दंड विधान कलम ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
|