23-May-2020 : १२ वर्षांच्या मुलीसह दोघे पॉझिटिव्ह
सांगली/ प्रतिनिधी
जिल्ह्यात शनिवारी आणखी २ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. धारावी येथून जिल्ह्यात आलेल्यांपैकी आणखी एक बारा वर्षाची मुलगी कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले. धारावीतून आलेल्या २३ जणांपैकी २१ जणांचे अहवाल आहेत. तर आतापर्यंत दोघे पॉझिटिव्ह आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यातील सोनारसिद्ध नगर मधील दोन कोरोना बाधित तरुणींचे ५५ वर्षीय वडीलही शनिवारी पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. जिल्ह्यात नव्याने दोन रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७४ वर पोहोचली. मात्र तिघे कोरोनामुक्त झाल्याने सद्यस्थितीत २९ रुग्ण झाले आहेत.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. बाहेरून येणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागले आहे त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होऊ लागल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामध्ये आणखी एक-दोन रुग्णांची भर पडली. धारावी येथून तब्बल २३जण जिल्ह्यात आले होते. इस्लामपूरमध्ये धारावी येथून आलेल्या व्यक्ती डमिट करण्यात आल्या आहेत. त्यातील १४ जणांच्या स्वाबचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले होते. त्यामध्ये ३७ वर्षीय एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. जिल्ह्यात आलेल्यांपैकी आणखी एक बारा वर्षाची मुलगीला काहीसा त्रास होत असल्याने किती तपासणी करण्यात आली होती. त्या मुलगीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्या मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचाराखाली आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
आटपाडी तालुक्यातील यापूर्वी चार व्यक्ती कोरोना बाधित आढळल्या होत्या. त्यामध्ये सोनारसिद्ध नगर येथील दोन बहिणीं कोरोना बाधित ठरल्या आहेत. यापैकी एकीचे वय २२ वर्ष व एकीचे वय २६ वर्षे आहे. त्यांच्यावर सध्या मिरजेतील सिव्हिल येथे आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. दोन बहिणींच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या ५५ वर्षीय वडिलांमध्ये कोरोना ची लक्षणे आढळली होती. त्यांची कोरोना तपासणीसाठी स्वाब तपासणीसाठी घेतला होता. त्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. सोनारसिद्ध नगरमध्ये एकाच कुटुंबातील तीन रुग्ण आढळल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
भिकवडी खुर्दमधील ११ वर्षीय, साळशिंगेतील
८ वर्षीय मुलगा व कुंडलवाडीचा तरुण कोरोनामुक्त
कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्दमधील अकरा वर्षीय, साळशिंगेतील (ता. खानापूर) येथील ८ वर्षीय मुलगा आणि वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे मुंबईतून आलेला तीस वर्षीय तरुण शनिवारी कोरोनामुक्त झाले. भिकवडी खुर्द आणि साळशिंगी येथील मुलगा अहमदाबाद येथून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता. त्यामुळे ते दोघे पॉझिटिव आढळले होते. दोघेही उपचारांनंतर कोरोना मुक्त झाले. कुंडलवाडीत आढळलेला तरुण मुंबईतून आला होता त्याचा मामा ही दोोन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह असल्याचेे स्पष्ट झाले मात्र तरुणाने कोरोनावर मात केली.
|