28-Jun-2020 : जनप्रवास प्रतिनिधी
श्र सांगली : हातकणंगले येथे फळविक्री करणार्या व्यक्तीस फळ विक्रीची गाडी लावण्याच्या वादातून सहाजणांना बेदम मारहाण केल्याची घटना काल शनिवार दि. २८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कोल्हापूर रोडवरील धामणीकडे जाणार्या रोडवर घडली. या मारहाण प्रकरणी मयुरेश महादेव लोखंडे (वय २४, रा. पंचशीलनगर, सांगली) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून शिवाजी बाळू मासाळ (वय २४, रा. मिरज) याच्यासह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी मयुरेश लोखंडे आणि शिवाजी मासाळ हे एकमेकांच्या ओळखीचे असून दोघेही फळविक्रीचा व्यवसाय करतात. दोघेही कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे सांगली - कोल्हापूर मार्गावर गाडी लावून फळ विक्री करत असतात. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये गाडी लावण्यावरून वाद सुरु होता. काल शनिवारी वादाचे पर्यवसान हाणा मारीत झाले.
|