14-Jul-2020 : जनप्रवास प्रतिनिधी
जत : जत तालुक्यातील मल्लाळ येथे ऑनलाईन शिक्षणासाठी शेतकरी वडिलांकडून वेळेत मोबाईल मिळत नसल्याने एका विद्यार्थ्याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. आदर्श आप्पासाहेब हराळे (वय १४, रा. मल्लाळ, ता. जत) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. सोमवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात वडील आप्पासाहेब मारूती हराळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , आदर्श हराळे हा नुकताच इयत्ता नववीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. जत शहरातील जत हायस्कूल येथे तो शिक्षण घेत होता. तो दहावीमध्ये प्रवेश घेणार होता. ‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद असल्याने शासनाने ऑनलाईन शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे.
त्यामुळे जत तालुक्यातील अनेक शाळांमध्ये मोबाईलवरून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. तसेच काही क्लास चालकदेखील ऑनलाईन शिक्षणाचे धडे देत आहे.
दरम्यान, आदर्श हराळे यानेही वडिलांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलची मागणी केली होती.
|