14-Jul-2020 : नांद्रे येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्ध गंभीर जखमी
जनप्रवास प्रतिनिधी
श्र सांगली : नांद्रे ते खोतवाडी मार्गावर भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीस्वाराच्या धडकेत सायकल वरून निघालेला एक वृद्ध गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दुचाकीस्वाराने पलायन केले. या अपघातात श्रीकांत आदगोंडा कवठेकर (वय ८०, रा. मागाडे गल्ली नांद्रे) हे गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताची नोंद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी पळून जाणार्या मोटरसायकलस्वाराचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. संतोष शांतीनाथ पाटील (सकळे गल्ली, नांद्रे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीकांत कवठेकर यांचे खोतवाडी गावाच्या हद्दीमध्ये शेत आहे. शुक्रवार दि. १० जुलै रोजी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास नांद्रे येथून ते त्यांच्या शेताकडे सायकलवरून जात होते. नांद्रे गावच्या कमानीजवळ ते आले त्याचवेळी संतोष काशिनाथ पाटील हे त्यांच्या मोटारसायकलवरून (क्र. एमएच १० एक्यू ७४९०) भरधाव वेगाने नांद्रेच्या दिशेने येत होते.
|